डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते उल्लेखनीय महिलांचा गौरव; बचत गटांसाठी २५ लाखांचा आमदार निधी जाहीर
धाराशिव (प्रतिनिधी) – महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, धाराशिव येथे शिवसेना महिला आघाडीतर्फे ‘दुर्गाशक्ती महिला सन्मान मेळाव्याचे’ भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरल्या विधान परिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे, ज्यांनी या मंचावरून महिला बचत गट सक्षमीकरणासाठी २५ लाख रुपयांच्या आमदार निधीची घोषणा केली.

या मेळाव्याला धाराशिवसह सोलापूर, लातूर आणि इतर तालुक्यांमधून शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देत डॉ. गोऱ्हे यांनी महिलांचे मार्गदर्शन केले. “आर्थिक स्वावलंबन हे महिला सबलीकरणाचे खरे माध्यम आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून उत्पादनक्षम उपक्रमांना प्रोत्साहन देऊन त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,” असे त्यांनी नमूद केले.
यावेळी २० प्रेरणादायी महिलांचा डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात त्यांनी पुढे सांगितले की, “महिलांनी शिक्षण, व्यवसाय आणि सामाजिक कार्यात पुढे यावे. शासनाने दिलेल्या संधींचा फायदा घेत स्वतःची ओळख निर्माण करावी.”
कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना जिल्हा प्रमुख सुरज साळुंखे, वरिष्ठ पदाधिकारी शुभांगी नांदगावकर आणि धाराशिव संपर्क प्रमुख संगीता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

या वेळी मंचावर उपस्थित मान्यवरांमध्ये मा. खासदार रवींद्र गायकवाड,महिला जिल्हा प्रमुख भारती गायकवाड, विभागीय सचिव अशोक पटवर्धन,जिल्हा संघटक किरणताई निंबाळकर,लातूर महिला संपर्क प्रमुख रंजना कुलकर्णी,तालुकाप्रमुख माया चव्हाण,शिवसेना कार्यकर्त्या कविता साळुंखे,तालुका अध्यक्ष कांता शिंदे,युवती सेना सदस्य आचल जांगित,उपजिल्हाप्रमुख राजश्री माने, पूजा उकरंडे,जिल्हा प्रमुख अर्चना दराडे,गडचिरोली संपर्कप्रमुख वर्षा मोरे,आणि मराठवाडा युवती सेना पदाधिकारी अॅड. आकांक्षा चौगुले यांचा समावेश होता.
या कार्यक्रमामुळे धाराशिवमधील महिला सशक्तीकरणाच्या कार्याला नवीन दिशा लाभली असून, आगामी काळात अशा उपक्रमांची गरज अधिक जाणवणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.













Users Today : 25
Users Yesterday : 67
This Month : 1817
Total Users : 27245