अलीकडील मुसळधार पावसामुळे कळंब तालुक्यातील इटकूर व वाशी तालुक्यातील घाटपिंपरी परिसरात मोठ्या प्रमाणात शेती व घरांचे नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्तांना धीर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली.

इटकूर येथे मधुकर अडसूळ यांच्या घरात पाणी शिरल्याने डॉ. पाटील यांनी त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेट देऊन दिलासा दिला. तसेच घाटपिंपरी येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीचीही पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.
या वेळी इटकूर येथे डॉ. पाटील यांच्यासोबत दत्ता गंभिरे, अभयसिंह आडसुळ, विक्रम पाटील, मधुकर आडसुळ, प्रशांत आडसुळ, विलास आडसुळ, पत्रकार अजित गायके, नितीन पाटील, दत्ता चोरघडे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

तर घाटपिंपरी येथे दयानंद सातपुते, उमेश सातपुते, पृथ्वीराज सातपुते, अक्षय सातपुते, कृष्णा गोडसे, शंकर मस्तुद यांची उपस्थिती होती.
नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाकडून तातडीने आणि योग्य मदत मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी दिली.









Users Today : 20
Users Yesterday : 67
This Month : 1812
Total Users : 27240