भूम (प्रतिनिधी)-भूम तालुक्यातील पिंपळगाव येथील शेतकरी विश्वनाथ दातखिळे यांचे 20 गाई तसेच इतर पशुधन महापुरात वाहून गेले. या दुर्दैवी घटनेनंतर विविध नेते भेटी देत मदत करत आहेत.
आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी त्यांच्या वतीने ₹51,000/- चा धनादेश देऊन शेतकऱ्याला मदत केली.
या वेळी पिंपळगावच्या सरपंच झीनत सय्यद, सरपंच परिषदेचे राज्य संघटक कोहिनूर सय्यद, तसेच महेश चव्हाण, समाधान मातने,लखन जाधव,वैभव जाधव, धनंजय जाधव आणि अशोक सोन्ने उपस्थित होते.
डॉ.प्रतापसिंह पाटील म्हणाले,
“आमच्या मदतीमुळे फारसा फरक पडणार नाही, मात्र समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या शेतकऱ्याला पुन्हा उभं करण्यासाठी हातभार लावावा, या हेतूने हा प्रयत्न केला आहे.”













Users Today : 41
Users Yesterday : 68
This Month : 1766
Total Users : 27194