मुंबई प्रतिनिधी -वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण यांचा वारसा पुढे नेत, शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना.एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना सचिव श्री. संजय पुष्पलता भाऊराव मोरे यांच्या स्वाक्षरीने डॉ. धनंजय गोविंदराव पडवळ यांची शिवसेना डॉक्टर सेलच्या राज्य प्रदेशाध्यक्षपदी (कार्यक्षेत्र – महाराष्ट्र राज्य) नियुक्ती करण्यात आली आहे. हे नियुक्तीपत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी शिवसेना सचिव संजय मोरे व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह राज्यभरातील विभागीय डॉक्टर सेलचे अध्यक्ष उपस्थित होते.

डॉ.धनंजय पडवळ हे राज्यभरात पक्षाच्या वैद्यकीय शाखेचे संघटन बळकट करतील तसेच जनतेपर्यंत शिवसेनेचा सामाजिक आणि आरोग्यविषयक कार्याचा विस्तार करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे राज्यातील डॉक्टर वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, डॉ. पडवळ यांच्या नेतृत्वात डॉक्टर सेलकडून जनजागृती, आरोग्य शिबिरे आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन अधिक प्रभावीपणे केले जाईल, असा विश्वास शिवसेना नेत्यांनी व्यक्त केला आहे.
प्रत्येक महिन्याचा कामाचा अहवाल ‘बाळासाहेब भवन’ कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
शिवसेनेच्या या महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी निवड झाल्याबद्दल डॉ. धनंजय पडवळ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.












Users Today : 64
Users Yesterday : 81
This Month : 1721
Total Users : 27149