धाराशिव :
धाराशिव शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी! दीर्घकाळापासून प्रतिक्षेत असलेला राजमाता जिजाऊ चौक ते सांजा रोड भवानी चौक या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते पार पडले.
हा रस्ता एमएसआयडीसी अंतर्गत हायब्रीड अॅन्युटी पद्धतीने मंजूर झाल्यामुळे शहराच्या खड्डेमुक्तीच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे. कायम रहदारी असलेल्या या मार्गामुळे नागरिक, विद्यार्थी व व्यापाऱ्यांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत होते.
राजमाता जिजाऊ चौक, आर्य समाज चौक, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक या संपूर्ण मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक आणि विद्यार्थ्यांची वर्दळ असते. या रस्त्याची दूरवस्था लक्षात घेता मोठ्या निधीची गरज होती.
या कामासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करवून घेतला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळताच शुक्रवारी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

या कार्यक्रमास शिवसेना जिल्हा संघटक सुधीर (अण्णा) पाटील, शहरप्रमुख आकाश कोकाटे, VJNT जिल्हाध्यक्ष कमलाकर दाणे, बांधकाम कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण डोलारे, पांडुरंग अंकुशे, महिला जिल्हासंघटक किरणताई निंबाळकर, महिला तालुकाप्रमुख मायाताई चव्हाण, महिला शहरप्रमुख कल्पनाताई माळी तसेच असंख्य शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
या भूमिपूजनानंतर नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, आता धाराशिव शहर खड्डेमुक्त होण्याच्या दिशेने पुढे सरकले आहे.















Users Today : 46
Users Yesterday : 55
This Month : 1545
Total Users : 26973