धाराशिव, ता. 3:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त भाजपकडून सुरू असलेल्या ‘संकल्प ते सिद्धी’ अभियानाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील ४७ वा ‘जनता दरबार’ कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे संपन्न झाला.
या दरबारात मल्हार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, व भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात हा उपक्रम पार पडला.
२,८७२ पैकी २,१४९ तक्रारींवर कार्यवाही
जिल्हाभरात आजपर्यंत झालेल्या ४७ जनता दरबारांमध्ये एकूण 2,872 तक्रारींची नोंद झाली असून, यापैकी 2,149 तक्रारींवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकाराने तत्काळ कार्यवाही करण्यात आली. उर्वरित तक्रारींचे निरसन संबंधित विभागांमार्फत प्रक्रियेत आहे.
खामसवाडी येथील दरबारात न्यायालयीन व धोरणात्मक विषय वगळता स्थानिक समस्यांवर थेट जागेवरच तोडगा काढण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत तक्रारी नोंदवण्यात आल्या.

कार्यकर्त्यांची आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती
या दरबारात जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नेताजी पाटील, संजय पाटील, कळंब तालुकाध्यक्ष अरुण चौधरी, दत्ता साळुंखे, वैभव मुंडे, महिला मोर्चा पदाधिकारी छाया बोंदर, माणिक बोंदर, किरण पाटील, तसेच भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
नागरिकांमध्ये समाधान व विश्वासाचे वातावरण
गावपातळीवर थेट संवाद व समस्यांचे तातडीने निरसन या दरबारांच्या वैशिष्ट्यांमुळे नागरिकांमध्ये समाधान आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा उपक्रम भाजपच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे प्रतिक ठरत आहे.