भुम (प्रतिनिधी) – भुम तालुक्यातील उद्योजकांनी कुर्डूवाडी, परंडा, भुम, चौसाळा, गेवराई, बीड, जालना हा नवीन रेल्वे मार्ग मंजूर करण्याची मागणी धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे करण्याचे ठरवले आहे. या मागणीमुळे या मागास भागाचा विकास साधण्यास मदत होईल, असे उद्योजकांचे म्हणणे आहे.

या बैठकीत भुम येथील उद्योजक गोरख चांगदेव भोरे, विनोद जोगदंड, अनिल शेळके, दत्ता लोहार, जालिंदर गोरे, महावीर सोट, किरण जाधव आदी उपस्थित होते. त्यांनी हा रेल्वे मार्ग मंजूर झाल्यास या भागातील व्यापार, उद्योग, शिक्षण आणि रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होईल, असे मत व्यक्त केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनेही या रेल्वे मार्गासाठी प्रयत्न सुरू असून, सर्व नागरिकांनी या उपक्रमात पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.












Users Today : 32
Users Yesterday : 67
This Month : 1824
Total Users : 27252