१६ एप्रिल रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात होणार सोडत कार्यक्रम
भूम (ता.प्रतिनिधी) – आगामी पंचवार्षिक २०२५ ते २०३० या कालावधीसाठी भूम तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींमधील सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची तारीख निश्चित करण्यात आली असून, १६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता हा महत्त्वाचा कार्यक्रम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, भूम येथे पार पडणार आहे.
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेश क्रमांक २०२५/सा.प्र/ग्रापंनि/का-१/सिआर-०२, दिनांक ८ एप्रिल २०२५ अन्वये ही प्रक्रिया पार पडणार असून, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांचे, अनुसूचित जाती-जमातींचे तसेच इतर मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी ही आरक्षण सोडत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
तहसीलदार जयवंत पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, या सोडत कार्यक्रमासाठी सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य तसेच इच्छुक ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, जेणेकरून प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार पार पडू शकेल.
या आरक्षण सोडतीच्या निमित्ताने ग्रामपंचायतींच्या पुढील नेतृत्वाचा पाया रचला जाणार असल्यामुळे, ग्रामविकासाच्या दृष्टीनेही ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.













Users Today : 31
Users Yesterday : 77
This Month : 1607
Total Users : 27035