काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद कोण सांभाळणार याविषयी गेल्या पंधरा दिवसापासून सातत्याने चर्चा होत होती.यामध्ये माजी मंत्री अमित देशमुख,विश्वजीत कदम, सतेज पाटील, यशोमती ठाकूर यांचेही नाव चर्चेत होतं.काँग्रेस पक्षात प्रथमच धक्का तंत्र वापरत बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

साखर कारखानदार किंवा शैक्षणिक संस्था असणाऱ्या व्यक्तींच्या हाती राज्यातील काँग्रेस पक्षातील सूत्र हाती द्यावी जेणेकरून त्यांची यंत्रणा वापरून पक्ष वाढ करता येईल असा मतप्रवाह पक्षात होता मात्र या सर्व गोष्टींना पूर्णविराम देत काँग्रेस हायकमांडने २०२९ च्या लोकसभा,विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सामान्य व्यक्तीला काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद दिले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जवळपास तीन वर्षे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सांभाळल्यानंतर आता हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र राज्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.













Users Today : 58
Users Yesterday : 77
This Month : 1634
Total Users : 27062