सांगोला (जिल्हा सोलापूर):
शिवसेना पक्षाच्या वतीने सांगोला येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य जनसभेला सोलापूर आणि सांगोला तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सभेस उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे उपस्थित राहिले होते.

ना. एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पराभवाचा उल्लेख करत, “शहाजीबापू पराभूत झाले असले तरी त्यांच्या पाठिशी मी ठामपणे उभा आहे,” असे सांगितले. त्याचबरोबर या मतदारसंघातील जनतेचे आभार मानत, “शहाजीबापूंना भरभरून मतदान करणाऱ्या मतदारांचे मनःपूर्वक आभार,” असेही ते म्हणाले.
ना. एकनाथ शिंदे यांनी सांगोला तालुक्याच्या पाणीप्रश्नावर बोलताना सांगितले की, “शहाजीबापू पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे वंदनीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला ८८३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे भविष्यात सांगोला तालुका दुष्काळमुक्त होईल.”
या सभेत ठाणे येथील डॉ. उमेश आलेगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
सभेस उपस्थित मान्यवरांमध्ये ग्रामविकास व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पर्यटन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी आमदार शहाजीबापू पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार समाधान अवताडे, आमदार राजू खरे, दीपकआबा साळुंखे, शिवसेना प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे, तसेच आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेते व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या सभेने सांगोला परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद पुन्हा अधोरेखित केली असून आगामी राजकारणात या भागातील शिवसेनेची भूमिका अधिक बळकट होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.













Users Today : 40
Users Yesterday : 68
This Month : 1765
Total Users : 27193