६०९५ बोगस नावे उघड – जिल्हाधिकाऱ्यांना उद्या निवेदन
धाराशिव (दि.२४ ऑगस्ट) – तुळजापूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर बोगस मतदानाचे रॅकेट कार्यरत असून अद्यापही यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा गंभीर आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
या पत्रकार परिषदेस जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर,जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, डीसीसी बँक संचालक मेहबुब पटेल, माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
ॲड. धीरज पाटील म्हणाले की, “चावडी वाचनावेळी राहुल गांधी यांच्या संदेशानंतर ६०९५ बोगस नावे समोर आली. अर्ज १६ ऑक्टोबर २०२४ रोजी दाखल केला असताना १७ ऑक्टोबर २०२४ रोजी FIR नोंद झाली. मात्र आता दहा महिने उलटूनही कोणतीही कारवाई झाली नाही.”
ते पुढे म्हणाले की, “या मतदारसंघात अजूनही अनेक बोगस नावे उघडकीस येणार आहेत. राज्यात कुठेही FIR नोंदवला नसताना तुळजापूर मतदारसंघात मात्र गुन्हा दाखल झाला आहे. हे रॅकेट अत्यंत मोठ्या प्रमाणावर असून त्यामागे शक्तिशाली हात आहेत.”
उद्या जिल्हाधिकाऱ्यांना (कीर्ती किरण पुजार) निवेदन देऊन पुढील लढा उभारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “खा. राहुल गांधी यांच्या आदेशानुसार लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानेच ही पत्रकार परिषद घेतली,” असे ॲड. पाटील यांनी नमूद केले.












Users Today : 37
Users Yesterday : 81
This Month : 1694
Total Users : 27122