कळंबची जबाबदारी दत्ता साळुंखे,अरुण चौधरी व मकरंद पाटील यांच्यावर तर वाशी मध्ये पुन्हा राजगुरू कुकडे यांनाच संधी
धाराशिव (प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश नेतृत्वाच्या निर्देशानुसार धाराशिव जिल्ह्यातील विविध मंडळांमध्ये नवीन मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या हस्ते या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.

या नियुक्तीमध्ये उमरगा ग्रामीण मंडळाच्या अध्यक्षपदी सिद्धेश्वर माने,मुरुम मंडळाच्या अध्यक्षपदी निरंजानंद अंबर, तर धाराशिव ग्रामीण पूर्व मंडळाचे अध्यक्ष म्हणून निळकंठ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धाराशिव ग्रामीण पश्चिम मंडळाची धुरा अनिल भुतेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
कळंब शहर मंडळाचे अध्यक्ष मकरंद पाटील, कळंब ग्रामीण पूर्व मंडळाचे अध्यक्ष अरुण चौधरी, कळंब ग्रामीण पश्चिम मंडळाचे अध्यक्ष दत्ता साळुंके, तसेच वाशी मंडळाचे अध्यक्ष म्हणून राजगुरु कुकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या सर्व मंडळ अध्यक्षांना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी आणि जनसंपर्क वाढविण्यासाठी जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून, त्यांच्या माध्यमातून भाजपाचे बळ वाढवले जाईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष दत्ता कुकणे यांनी व्यक्त केला.
“सर्व नविन अध्यक्षांनी पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहचवून विश्वासार्ह नेतृत्व उभे करावे. पक्षसंघटनेला अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी परिश्रम घ्यावेत,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या निवडीमुळे धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक भक्कम होण्यास हातभार लागेल, असा पक्षातील कार्यकर्त्यांचा विश्वास आहे.













Users Today : 50
Users Yesterday : 68
This Month : 1775
Total Users : 27203