राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवेदनानुसार, ही पत्रकार परिषद मंत्रालयासमोरील सचिवालय, जिमखाना, मुंबई येथे होणार आहे. या परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतचा कार्यक्रम, टप्पे, तसेच आचारसंहिता लागू होण्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
राज्यभरात मागील काही आठवड्यांपासून निवडणुकीच्या तारखांबाबत तर्कवितर्क सुरू होते. अखेर आज आयोग स्वतः पत्रकार परिषद घेऊन यावर अधिकृत घोषणा करणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे सहाय्यक आयुक्त (जनसंपर्क) डॉ. जगदीश मोरे यांनी सर्व वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना या पत्रकार परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
📍 ठिकाण: सचिवालय, जिमखाना, मंत्रालयासमोर, मुंबई
🕓 वेळ: दुपारी ४.०० वाजता
📅 दिनांक: मंगळवार, ४ नोव्हेंबर २०२५
राज्यातील सर्वांच्या नजरा आता या पत्रकार परिषदेकडे लागल्या असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल आज वाजणार हे निश्चित मानले जात आहे!














Users Today : 11
Users Yesterday : 77
This Month : 1587
Total Users : 27015