धाराशिव (प्रतिनिधी)-शिवसेना पक्षाच्या आंदोलन समन्वयकपदी श्री.तुकाराम शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचा व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिकवणीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष सचिव संजय पुष्पलता भाऊराव मोरे यांच्या स्वाक्षरीने अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. या पदाचा कार्यकाल एक वर्षाचा असणार आहे.
श्री. शिंदे यांनी पक्षाच्या वाढीसाठी आणि संघटन बळकटीसाठी सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या नियुक्तीचे सर्वत्र अभिनंदन होत असून, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.











Users Today : 59
Users Yesterday : 81
This Month : 1716
Total Users : 27144