विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि राज्यात महायुतीचे सरकार आले.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल या अपेक्षेने महाविकास आघाडीत राहिलेल्या नेत्यांचा भ्रमनिरास झाला आहे. प्रामुख्याने अनेक दिवस सत्तेच्या जवळ राहणाऱ्या नेत्यांना याची अडचण होऊ लागली आहे.त्यातच कार्यकर्त्यांच्या नावावर बिल फाडली जात असून कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आता आपल्याला पक्ष बदल करण्याशिवाय पर्याय नाही अशी देखील चर्चा माध्यमात पसरवली जात आहे.
त्यातच आता धाराशिव जिल्ह्यातील एक माजी आमदार हे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वीस तारखे नंतर पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या जोरदारपणे सुरू आहे. विशेष म्हणजे या नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभेला उमेदवारी देखील मिळाली होती मात्र तरी देखील चारच महिन्यात सत्तेच्या जवळ जाऊन बसण्याचा त्यांचा मनसुबा दिसत आहे.
विशेष म्हणजे या नेत्याला लोकसभा निवडणुकीच्या वेळीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारीची ऑफर दिल्याची चर्चा देखील जोरदार होती. मात्र त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे असलेले वातावरण पाहून अनेकांनी नातेगोते विसरून आहे त्या जागी राहणे पसंत केले. मात्र आता महाविकास आघाडीचे काही खरे नाही असे दिसत असताना हे माजी आमदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिट्टी देणार असून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत.
यावेळी राजकीय कट्टाच्या प्रतिनिधींनी माजी आमदार राहुल मोटे यांच्याशी संपर्क साधला असता या चर्चा निरर्थक असून असं काहीही होणार नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार राहणार आहे अशी प्रतिक्रिया दिली.













Users Today : 51
Users Yesterday : 62
This Month : 1495
Total Users : 26923