महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी व महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा महाराष्ट्र राज्यात सुरू आहे. पुण्याचे माजी महापौर व विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची समाज माध्यमांमध्ये चर्चा जोरदारपणे सुरू होती. ती चर्चा सर्वप्रथम राजकीय कट्टा या सोशल मीडिया वृत्तवाहिनीवर सुरू झाली आणि त्याचे पडसाद राज्यभर इतर सोशल मीडिया वृत्तवाहिनीवर देखील उमटले व ना.मुरलीधर मोहोळ हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा झाली व भाजप अशाप्रकारे राज्यात बदल करू शकते यावर देखील लोकांचा विश्वास बसला कारण 2014 ला ज्यावेळी देवेंद्र फडणवीस हे राज्यात मुख्यमंत्री झाले त्यावेळेस देखील ते नवखेच होते.त्यामुळे त्या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ शकते.

विशेष म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव लोकांना भाजपाकडून बऱ्यापैकी पसंतीस देखील उतरले याचे एकमेव कारण म्हणजे त्यांचा सोज्वळ चेहरा,केंद्रीय राज्यमंत्री पदाचा अनुभव,पुण्यासारख्या शहराचे महापौर म्हणून केलेले काम,मराठा चेहरा आणि अमित शहा सांभाळत असलेल्या सहकार खात्याचे राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे आहे. या सर्व गोष्टीमुळे ही चर्चा निरर्थक आहे असं नाही तर नक्कीच या चर्चेत काहीतरी सत्य आहे म्हणूनच राजकीय कट्टाने सर्वप्रथम ही बातमी प्रकाशित केली. त्याचे पडसाद राज्यभर उमटले. शेवटी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना या विधानावर ट्विटरद्वारे स्पष्टीकरण द्यावे लागले आणि समाज माध्यमाच्या चर्चा सुरू आहे त्यांनी निरर्थक असल्याचे त्यांनी सांगितले.












Users Today : 48
Users Yesterday : 62
This Month : 1492
Total Users : 26920