Thursday, December 18, 2025
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान
No Result
View All Result
rajkiyakatta.in
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

नात्यागोत्याचे राजकारण विकासाच्या आड येऊ देऊ नका – प्रा. डॉ.तानाजीराव सावंत

Rajkiy Katta by Rajkiy Katta
12 November 2024
in Blog, राजकीय, राजकीय कट्टा
0
नात्यागोत्याचे  राजकारण विकासाच्या आड येऊ देऊ नका – प्रा. डॉ.तानाजीराव सावंत
0
SHARES
75
VIEWS

रामकुंड, वाकवड, सोनगिरी, भोनगिरी या गावांची वाकवड येथे कॉर्नर बैठक पार पडली, तर दिंडोरी, हिवरा, हांडोग्री, वंजारवाजी या गावांची हांडोग्री येथे बैठक पार पडली. याप्रसंगी प्रा. डॉ. तानाजीराव सावंत हे बोलत होते. वाकवड येथे बोलताना ते म्हणाले, की येथील पुलाचा प्रश्न मंत्रीपदाची शपथ घेतल्या घेतल्या दोन महिन्यांत मार्गी लागेल. मी मतदारसंघात विकास केला असेल तर मला मतदान करा, नाही तर मला तुमच्या शिवारातही येऊ देऊ नका. आमच्या बहिणींसाठी ‘लाडकी बहीण योजना’ सुरू केली, सरकारी दवाखान्यात मोफत उपचार केले, ज्या ज्या वेळी महायुतीची सत्ता आली विकास सुरू झाला, आणि नंतर महाआघाडीच्या काळात तो खुंटला. आपल्या मतदारसंघातील पुढील विकासाकरिता निधी आणण्यासाठी राज्यात महायुतीचेच सरकार सत्तेवर आले पाहिजेत. कारण, राज्यात व केंद्रात एका विचाराचे सरकार असेल तर विविध योजनांसाठी केंद्राचा पैसा मिळतो. एखाद्या योजनेसाठी १०० रूपयांतील ६० रूपये हे केंद्राचे असतात, तर ४० रूपये हे राज्य सरकारचे असतात. राज्यात झालेल्या सर्व्हेप्रमाणे महायुतीचे १८० आमदार निवडून येणार आहेत, पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार सत्तेवर येणार आहे, त्यामुळे महायुतीचे सरकार सत्तेवर आले तर आपली राहिलेली विकासकामे मार्गी लागणार आहेत. तेव्हा गाफील न राहाता मतदान करा, व तब्बल एक लाखाच्या लीडने विधानसभेत पाठवा, असे आवाहनही प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी केले. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर लगेचच शेतकरी कर्जमुक्त केला जाणार असून, तशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जाहीरनाम्यांत केलेलीच आहे. माजी आमदारांना व विरोधकांना जर खरेच जनतेची, तुमची काळजी असेल तर त्यांनीदेखील धनुष्यबाणाला पाठिंबा द्यावा, असा टोलाही प्रा. डॉ. सावंत यांनी राजकीय विरोधकांना हाणला.

तर हाडोंग्री येथे प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी श्री ष. ब्र.१०८ श्रीगुरू राचलिंग शिवाचार्य परंडकर महाराज यांचे आशीर्वाद घेतले. महाराजांनी त्यांना विजयी होऊन लाखोच्या मताधिक्यासाठी आपल्या शुभेच्छा व आशीर्वाद दिलेत. यानंतर हांडोग्री येथे झालेल्या कॉर्नर बैठकीत बोलताना प्रा. डॉ. तानाजीराव सावंत म्हणाले, की शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पाणी न्यायाचे आहे. प्रत्येक गणात ३३ केव्हीचे सबस्टेशन उभारून विजेची समस्या सोडवायची आहे. कारण, आता लवकरच पाणी येत आहे. आपल्या श्रीराम बँकेच्या शाखा विस्तारणार असून, त्याद्वारे शेतकरी, युवकांच्या कर्जाच्या समस्या सोडविल्या जाणार आहेत. भूम येथे पाच लाख लीटरचा आपला दूध संघ निर्माण करणार असून, सोयाबीनपासून तेल काढणार्‍या फॅक्टर्‍या आणायच्या आहेत. त्याद्वारे शेतकर्‍यांच्या सोयाबीनला चांगला भाव तर मिळेलच; पण रोजगारही निर्माण होतील. मी हात लावतो तेथं काहीही वाया जात नाही, पण माजी आमदार जेथं हात लावतो, तेथं सर्व वाया जातयं, असा टोलाही त्यांनी राजकीय विरोधकांना हाणला. २०१९ला मी शब्द दिला, अन पाणी आणलं. साखर कारखान्यांच्या माध्यमातून युवकांना रोजगार देतो, माजी आमदाराने त्यांच्या भावाला तरी रोजगार दिला आहे का? नात्यागोत्याचे राजकारण करू नका, विरोधकांना पाहुणा आहे म्हणून जेवू घाला, पण विकासाच्या आड येऊ देऊ नका, असेही त्यांनी सांगितले. सत्तेसाठी ते संविधान बदलणार आहे, म्हणून खोटे नरेटीव्ह पसरवून लोकांची डोकी भडकावित आहेत, असेही प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी याप्रसंगी सांगितले.

या कॉर्नर बैठकांना शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख अर्चनाताई दराडे, तालुकाप्रमुख बालाजी गुंजाळ, माजी सदस्य दत्ता मोहिते, पंचायत समिती सभापती शिवाजी भडके, माजी पंचायत समिती सदस्य मधुकर अर्जुन, माजी सरपंच अशोक गायकवाड, खंडेराव भोहेकर, सर्कल प्रमुख विजय भडके, युवासेना प्रमुख रूपेश भडके, भाजपाचे चंद्रकांत मासाळ, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र हरणे, बिरमल मासाळ, बाळासाहेब क्षीरसागर, बालाजी बांगर, सरपंच अनिता मासाळ, सरपंच संदीप मगर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हांडोग्रीकर, माजी सरपंच सुधीर क्षीरसागर, ईश्वर जगदाळे हिवरा, अगंद जगदाळे हिवरा, वैजिनाथ गपाट दिंडोरी, बाळासाहेब गपाट दिंडोरी, दादा डोबांळे वंजारवाडी आदींसह महिला, पुरूष, युवा कार्येकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

आ.कैलास पाटील यांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवा-उद्धव ठाकरे

Next Post

गेली ३५ वर्षे विरोधकांना पाणी आणता आलं नाही,फक्त लोकांना फसवलं-डॉ.तानाजीराव सावंत

Related Posts

धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती
Blog

धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती

5 November 2025
नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
राजकीय

नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

4 November 2025
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज घोषणा होणार!
Blog

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज घोषणा होणार!

4 November 2025
जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेश कांबळे यांचे राजकारणात पुनरागमन होणार?
Blog

जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेश कांबळे यांचे राजकारणात पुनरागमन होणार?

2 November 2025
धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
राजकीय

धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

1 November 2025
“धाराशिवच्या विकासामध्ये राजकारण नको!”-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील
राजकीय

“धाराशिवच्या विकासामध्ये राजकारण नको!”-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील

31 October 2025
Next Post
गेली ३५ वर्षे विरोधकांना पाणी आणता आलं नाही,फक्त लोकांना फसवलं-डॉ.तानाजीराव सावंत

गेली ३५ वर्षे विरोधकांना पाणी आणता आलं नाही,फक्त लोकांना फसवलं-डॉ.तानाजीराव सावंत

Recent Posts

  • धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती
  • नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
  • राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज घोषणा होणार!
  • जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेश कांबळे यांचे राजकारणात पुनरागमन होणार?
  • धाराशिव शहर खड्डेमुक्त होणार!राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रोड भवानी चौक रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

Recent Comments

No comments to show.

Counter

479564
Users Today : 2
Users Yesterday : 55
This Month : 1501
Total Users : 26929
  • Home Page

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
  • पश्चिम महाराष्ट्र
  • धाराशिव
  • कृषी वार्ता
  • तंत्रज्ञान

© 2024 Rajkiya Katta - Design and Developed by DK Techno's.

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group