धाराशिव : आगामी विधानसभा निवडणुकीत धाराशिव – कळंब मतदार संघातून शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार अजित पिंगळे (शिवसेना )यांना विजयी करण्यासाठी शिवसैनिकांनी एकजुट दाखवली आहे. या विजयाच्या संकल्पासाठी धाराशिव येथील जत्रा फंक्शन हॉलमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची मोठी बैठक पार पडली. खासदार बारणे आणि शिवसेना नेत्या ज्योतीताई वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना आणि शिवसेनेच्या अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या बैठकीचे आयोजन जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी केले होते. या बैठकीत धाराशिव – कळंब मतदार संघात महायुतीच्या उमेदवार अजित पिंगळे यांचा विजय कसा साधायचा याबद्दल सखोल चर्चा झाली. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या विविध स्तरांवर कार्यरत असलेल्या शिवसैनिकांना प्रभावी प्रचारासाठी दिशा दिल्या. यावेळी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या ताकदीने प्रचारात उतरून विजय निश्चित करण्याचा निर्धार व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी निर्धार
शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा सत्तेवर आणण्याच्या निर्धारावर भर दिला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विकासाची एक नवीन लाट आली असून, त्यांचा कार्यकाळ सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी समर्पित राहिला आहे, असे शिवसैनिकांनी यावेळी सांगितले. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी अजित पिंगळे यांचा विजय आवश्यक आहे, असा विश्वास उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केला.
महायुतीचा विजय साधण्यासाठी कार्यकर्त्यांची बांधिलकी

यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडी, युवा सेना आणि इतर अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली. विशेषतः, प्रत्येक शिवसैनिकाला मतदारांशी संवाद साधून महायुतीचे ध्येय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे महत्त्व सांगण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीत पिंगळे यांच्या प्रचार मोहिमेच्या विविध बाबींचा आढावा घेऊन प्रचार कसा अधिक परिणामकारक करता येईल, यावर सखोल विचार विनिमय करण्यात आला.












Users Today : 12
Users Yesterday : 55
This Month : 1511
Total Users : 26939