कॉर्नर बैठकीत महाविकास आघाडीच्या आमदार, खासदारावर आरोपांची बरसात
पळसप – धाराशिव मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांनी महाविकास आघाडीच्या विद्यमान आमदारांवर जोरदार टीका केली आहे.
विद्यमान आमदारांनी मतदारसंघाच्या विकासाची वाट न पाहता स्वतःच्या फायद्यासाठी कामे करून राजकीय पोळी भाजून घेतली आहे.ज्या कामांत नागरिकांचा काहीही फायदा नाही,अशी कामे करून जनतेला भावनिक बनवून त्यांच्या भावनांवर खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे.असे प्रतिपादन महायुतीचे धाराशिव मतदारसंघाचे उमेदवार अजित पिंगळे यांनी दि.९ नोव्हेंबर २०२४ रोजी मतदारसंघातील कोल्हेगाव, पळसप,विठ्ठलवाडी,गोरेवाडी या गावात जावून मतदारांशी संवाद साधला.
प्रथमतःगावातील मारुती मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व सिद्दीक जियाउद्दीन बाबा रहे या दर्ग्यात जावून दर्शन घेतले.यावेळी मतदारांच्या वतीने महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना अजित पिंगळे म्हणाले,महाविकास आघाडीच्या आमदारांचे काम जनतेच्या भल्यासाठी नसून,फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आहे.धाराशिवच्या विकासाला गती देण्यासाठी आणि या मतदारसंघातील जनतेच्या हितासाठी काम करायचे असल्यास धनुष्य बाण चिन्हावर मतदान करा व मला संधी द्या असे आवाहन केले.













Users Today : 30
Users Yesterday : 67
This Month : 1822
Total Users : 27250