धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कळंब तालुकाप्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे हे उद्या आपल्या समर्थकांसह परंडा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत.
गेल्या अनेक दिवसापासून कापसे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा माध्यमातून होत्या मात्र आता त्यांच्या प्रवेशाला मुहूर्त मिळाला असून उद्या ते आपल्या समर्थकांसह शिवसेना पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.त्यांच्या प्रवेशामुळे कळंब तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कळंब तालुक्यातील एक महत्त्वाचा चेहरा हा सोडून चालला आहे. शिवसेना शिंदे गटात यापूर्वीच त्यांच्या विरोधकांनी प्रवेश केल्यामुळे आता या सर्वांची मोट कशी बांधली जाणार याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष आहे.
शिवाजी कापसे हे विधानसभा निवडणूक लढवू इच्छितात व त्यांना महाविकास आघाडी कडून विद्यमान आमदार कैलास पाटील हे उमेदवार निश्चित असल्यामुळे संधी दिसत नव्हती त्यामुळेच त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवाजी कापसे यांनी कळंबचे नगराध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द जोरदार राहिली असून कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून देखील ते कार्यभार पाहत आहेत. तसेच ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख म्हणून देखील काम पाहत होते.आता त्यांच्या समवेत किती लोक आणि कोण कोण प्रवेश करणार याची उत्सुकता आहे.













Users Today : 25
Users Yesterday : 67
This Month : 1817
Total Users : 27245