परंडा राजकीय कट्टा वृत्तसेवा- परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखान्यासमोर पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांची पुतणे धनंजय सावंत यांच्या निवासस्थानासमोर मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले असून परांडा भागात शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आहे.

या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू असतानाच मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले असून पोलिसांनी देखील तपास जलद करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
अधिक माहिती अशी की, पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या सोनारी कारखान्यासमोरील घरासमोर मध्यरात्री अज्ञात दोन इसमानी येऊन गोळीबार केला असून या गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकले नाही. गोळीबार करणारे दोघे दुचाकीवरून पळून गेल्याचे बंगल्याच्या सुरक्षारक्षकांनी सांगितले. या प्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दोनच दिवसांपूर्वी खंडेश्वरी प्रकल्पाच्या कार्यक्रमा वेळी देखील गोंधळ झाला होता.परंडा तालुक्यात अशा घटनांमुळे गुंडाराज निर्माण झाल्याची देखील सध्या चर्चा आहे.













Users Today : 30
Users Yesterday : 67
This Month : 1822
Total Users : 27250