मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार.
धाराशिव प्रतिनिधी
५० पन्नास हजार पेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळवून देण्यात येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा महा नमो रोजगार मेळावा मंजूर माझ्या आग्रहाखातर मंजूर केला असल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांनी दिली आहे.
वास्तविक पाहता हा मेळावा विभागीय केंद्रांमध्ये होतो. पण आजपर्यंत माझ्या जिल्ह्याला विकासापासून दूर ठेवण्यात आले. बेरोजगारांची संख्या मोठी आहे. फारसे मोठे प्रकल्प मंजूर झाले नाहीत. त्यामुळे माझा जिल्हा आकांक्षित जिल्हा म्हणून नोंद झालेला आहे. अशी बरीच कारणे सांगून धाराशिव येथे मंजूर करून घेतला असेही केदार यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी धाराशिव यांना आदेश देखील पोचले आहेत. आता राज्यातील मोठ मोठ्या कंपन्या बोलावण्यात येतील. तसेच जास्तीत जास्त तरुणांनी या करिता नोंदणी करावी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वात यासाठी मंगलप्रभात लोढा अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन हा मेळावा धाराशिव देण्याचे मान्य केले.सर्वांना सोबत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला जाईल. पालकमंत्री तानाजी सावंत तसेच आमदार ज्ञानराज चौगुले व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे मार्गदर्शन घेतले जाईल असे शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांनी सांगितले आहे.













Users Today : 38
Users Yesterday : 81
This Month : 1695
Total Users : 27123