धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत शिवसेना पक्षात प्रवेश केला.२०१७ मध्ये शिवसेना पक्षातून त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.आता परत ते शिवसेनेत दाखल झाले आहेत.कळंब धाराशिव विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला असल्याचे बोलले जाते.धाराशिव जिल्ह्यातील तीन विविध पक्षातील नेते शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची बातमी राजकीय कट्टा नी दोन दिवसांपूर्वीच सांगितली होती.आता कळंब मधील एक नेता पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या मध्यस्थीने तर धाराशिव येथील एक नेत्यांनी देखील थेट मुख्यमंत्री यांची भेट घेऊन प्रवेशा संदर्भात चर्चा केल्याची विश्वसनीय माहिती आहे. आता सुधीर पाटील यांच्या प्रवेशानंतर हे दोन नेते काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.


असा झाला सुधीर पाटील यांचा राजकीय प्रवास
शिवसेनेत सन १९८८ साली पक्षप्रवेश केला व १९९० साली धाराशिवमधून विधानसभा निवडणूक लढवली होती. शिवसेना उपजिल्हाप्रमुख म्हणून ३ वर्षे काम करण्याची संधी मिळाली. तर ६ वर्षे धाराशिव जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यानंतर २०१४ मध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.
शिवसैनिक म्हणून धाराशिव जिल्ह्यात मी राजकीय कार्याला सुरुवात केली. त्यानंतर, माझ्या कामाची पद्धत आणि शिवसैनिकांमधला गुण रक्तातच असल्याने शिवसेनेत मला उपजिल्हाप्रमुख म्हणून ३ वर्षे काम करण्याची संधी मिळाली. तर ६ वर्षे धाराशिव जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. या काळात शेतकरी, व सर्वसामान्यांसाठी अनेक आंदोलने केली. शिवसेनेच्या शाखा गावखेड्यात वाढविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. त्यामुळे, आज पुन्हा शिवसेनेत परत येत असताना आपल्या जुन्या घरी आल्याची जाणीव होतेय.
सुधीर पाटील
शिवसेना पक्ष धाराशिव












Users Today : 32
Users Yesterday : 67
This Month : 1824
Total Users : 27252