छत्रपती संभाजीनगर राजकीय कट्टा वृत्तसेवा -काका पुतण्यामधील संघर्ष थांबायला तयार नाही. आता काकाने आणखी एक महत्त्वाचा शिलेदार जो राज्यातील सत्तांतरावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत गेले होते ते माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज छत्रपती संभाजी नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पक्षात प्रवेश केला.
नुकत्याच राज्यात दोन जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य निवडून आले.त्यामध्ये एक राजेश विटेकर देखील होते ते परभणी जिल्ह्यातील आहेत व पक्षांतर्गत स्पर्धेत राजेश विटेकर हे आपल्याला आता वरचढ ठरतील त्यापेक्षा आपण शरद पवार यांचा पक्ष स्वीकारलेला बरा अशी मानसिकता करून बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षात प्रवेश केला असल्याच देखील म्हटले जात आहे.
यावेळी बाबाजानी दुर्राणी यांनी बोलताना सांगितले की,शरद पवार यांना सोडून गेलेला एकही नेता पुढे टिकत नाही आपण त्या यादीत असू नये म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत आहे यापूर्वीही ते माझे नेते होते आणि नंतरही राहतील मध्यंतरी काही काळ मी अजित दादांसोबत जरी असलो तरी देखील मनाने मात्र पवार साहेबांसोबतच होतो असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.













Users Today : 54
Users Yesterday : 77
This Month : 1630
Total Users : 27058