धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा –
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यात धारशिव मध्ये मतदान होणार आहे. अवघ्या काही दिवसांवर मतदान येऊन ठेपल्याने या मतदारसंघात प्रचाराने वेग घेतला आहे. काशी विश्वेश्वरप्रमाणेच तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राचा कायापालट पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की करतील. महायुतीच्या उमेदवाराला मत म्हणजे नरेंद्र मोदी यांना समर्थन होय. त्यातून जिल्ह्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
महायुतीच्या उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना पटेल म्हणाले, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा आम्ही जपला आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकासासाठी नरेंद्र मोदी यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. मोदीजींनी देशाचा चेहरा मोहरा बादळण्याचे काम केले. त्यांनी अगदी छोट्या – छोट्या कामातून आपल्या कार्याची सुरुवात केले, जनधन, प्रधानमंत्री आवास योजना, नळ योजना, आयुष्यमान भारत यामधून त्यांनी खालच्या वर्गाला वर आणण्याचे काम केले. त्यांना जनसामान्यांचे दुखणे माहिती आहे. आज आपले शेजारील राष्ट्र चीन, पाकिस्तान आपल्याकडे नजर वर घेऊन बघत नाही, विश्वातील सर्व राष्ट्रांत आपला दबदबा वाढला आहे, भारतिय माणसाला सन्मान मिळत असतो तो मोदी यांच्यामुळेच. हे सर्व मोदी यांच्या स्थिर सरकार मुळेच शक्य झाले आहे.
धाराशिव – तुळजापूर – सोलापूर रेल्वे मार्गाचे काम 2019 साली मंजूर झाले, मात्र अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांच्याकडून एक रुपायाही मिळाला नाही, शिंदे सरकार येताच 450 कोटींचा निधी मिळाला. पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, तो सोडविण्यासाठी अकरा हजार कोटी रुपयांची गरज आहे, ते काम फक्त मोदीजी करू शकतात यामुळे अर्चना पाटील यांना मोठ्या मताधिक्याने संसदेत पाठवून द्या. पाण्याचा प्रश्न नरेंद्र मोदी यांच्या मदतीने दूर झाल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी शेवटी नमुद केले.













Users Today : 30
Users Yesterday : 67
This Month : 1822
Total Users : 27250