धाराशिव शहरातील जनतेस विनंती — विकासाच्या कामांबाबत सत्य परिस्थिती समजून घ्या
धाराशिव शहरातील नागरिकांनी शहराच्या विकासाशी संबंधित मागील काही घटनांचा बारकाईने अभ्यास करावा, अशी विनंती भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल हरिभाऊ काकडे यांनी केली आहे.
शहरातील रस्ते सुधारण्यासाठी मंजूर झालेला ₹१४० कोटी रुपयांचा निधी हा महायूती सरकारच्या काळात मंजूर झाला होता. या निधीच्या मंजुरीसाठी आमदार राणाराजगजितसिंह पाटील यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्या काळात ते तुळजापूरचे आमदार असून, त्यांनी तुळजापूर, नळदुर्ग, धाराशिव आणि कळंब या भागांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला.
अलीकडेच या कामाचा कार्यारंभ आदेश निर्गमित झाला, अशी आनंददायक माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली. या वार्तेनंतर रस्त्यावरील खड्यांनी त्रस्त झालेल्या धाराशिवकरांमध्ये एक आशेचा किरण निर्माण झाला आणि आनंदाचे वातावरण पसरले.
मात्र, लगेचच दुसऱ्या दिवशी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या कामावर टीका करत SIT चौकशी लावण्याची मागणी केली. या भूमिकेमुळे असे दिसून आले की शहरात विकासकामे सुरू होणे काहींना पचले नाही.
याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांनी या कामाला तात्पुरती स्थगिती मिळाल्याची बातमी आली. या बातमीचे काही गटांकडून सोशल मीडियावर आनंदाने शेअरिंग होत असल्याचे नागरिकांनी पाहिले, ज्यामुळे अनेक धाराशिवकरांच्या मनात प्रश्न निर्माण झाला — शहराच्या विकासाला आडकाठी आणण्यात आनंद का?
या घटनेवर भाष्य करताना राहुल काकडे म्हणाले,
“हा आनंद म्हणजे शहराच्या प्रगतीच्या विरोधातील मानसिकतेचा पुरावा आहे. पण धाराशिवकरांनी निराश होऊ नये. आमदार राणाजगजितसिंह पाटील निश्चितच या अडचणींवर मात करतील आणि आपल्याला हक्काचे रस्ते मिळवून देतील.”
शेवटी त्यांनी जनतेला आवाहन केले —
“आपण सर्वांनी आ. राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर विश्वास ठेवावा. विकास थांबवणाऱ्यांना इतिहास माफ करणार नाही. आपण सर्व मिळून शहराच्या प्रगतीसाठी एकजुटीने उभे राहूया.”













Users Today : 17
Users Yesterday : 77
This Month : 1593
Total Users : 27021