लवकरच होणार १०१ गायींचे वाटप
धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांनी पूरग्रस्त पशुपालकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत, १०१ गायींचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पत्रकार सतीश मातने यांनी केलेल्या मागणीला दिलेला थेट प्रतिसाद आहे.
अलीकडील पूरपरिस्थितीत जिल्ह्याची पाहणी करताना व साडेसांगवी या ठिकाणी 14 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री सरनाईक यांनी “पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन,” असे आश्वासन दिले होते. त्यावेळी पत्रकार सतीश मातने यांनी पूरग्रस्त पशुपालकांच्या झालेल्या मोठ्या नुकसानीकडे त्यांचे लक्ष वेधले होते आणि शासनाकडून थेट गायींचे वाटप करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती.

या मागणीला संवेदनशीलतेने प्रतिसाद देत पालकमंत्री सरनाईक यांनी तत्काळ पुढाकार घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी १०१ गायींच्या वाटपाचे पोस्टर अनावरण करण्यात आले, तसेच एक प्रतिकात्मक गाईची मूर्ती उपमुख्यमंत्री शिंदे यांना भेट देण्यात आली.
याआधीही प्रताप सरनाईक यांनी साडेसांगवी गावाला मोठ्या प्रमाणात मदत करून तेथील मूलभूत गरजा पूर्ण केल्या होत्या. आता पूरग्रस्त पशुपालकांना गायींचे वाटप करण्याच्या निर्णयामुळे पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या या दानशूर आणि कृतीप्रधान निर्णयाचे जिल्हाभरातून कौतुक होत असून, पात्र पशुपालकांची निवड करून गायींचे वितरण करण्याचे काम प्रशासन, स्थानिक कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हाती घेतले जाणार आहे.












Users Today : 25
Users Yesterday : 67
This Month : 1817
Total Users : 27245