धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.प्रताप सरनाईक यांनी काल रात्री जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि माजी मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरी भेट देऊन त्यांच्यासोबत गुप्तगु केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात चांगलाच खळबळजनक भूचाल निर्माण झाला आहे.
पूरग्रस्तांसोबत ‘दिवाळी’ कार्यक्रमानंतर अचानक भेट
काल रात्री साडेसांगवी ता.भूम येथे पूरग्रस्तांसोबत “दिवाळी हा अनोखा कार्यक्रम” पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमानंतर पालकमंत्र्यांचा ताफा परतीच्या मार्गावर निघत असताना, गावातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी त्यांनी अचानक घोषणा केली —
“ये आरे धनंजय, कुठे आहेस? इकडे ये!”
यावेळी त्यांनी धनंजय सावंत यांना खास सन्मानाने बोलावून घेतले आणि उपस्थित जनतेसमोर त्यांचा गौरव केला.

“स्वतः गाडी चालवत” धनंजय सावंत यांनी नेले पालकमंत्र्यांना
यानंतर धनंजय सावंत यांनी पालकमंत्री सरनाईक यांच्याशी काही विषयांवर व्यक्तिगत चर्चा करण्यासाठी स्वतःच्या गाडीत बसवून, स्वतः ड्रायव्हिंग करत थेट सोनारी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले असून, जिल्ह्याच्या सत्ताधारी आणि विरोधी गटांमध्येही हालचाली सुरू झाल्याचे संकेत आहेत.
राजकीय विजनवासानंतर धनंजय सावंत पुन्हा सक्रिय?

विधानसभा निवडणुकीनंतर धनंजय सावंत हे राजकारणातून थोडेसे अलिप्त झाले होते. सावंत कुटुंबातील कौटुंबिक मतभेदांमुळे ही दूरी निर्माण झाल्याची माहिती होती. मात्र, कालच्या घटनेनंतर त्यांनी “मीही चालू पालकमंत्र्यासोबत आहे” असा राजकीय संदेश दिल्याचे मानले जात आहे.
जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती, सावंतांची उपस्थिती चर्चेचा विषय

साडेसांगवीतील कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्तात्रय साळुंखे आणि गौतम लटके यांच्याव्यतिरिक्त बहुतेक पदाधिकारी अनुपस्थित होते. ही माहिती मिळताच धनंजय सावंत यांनी उपस्थिती लावून कार्यकर्त्यांची कसर भरून काढली, असे स्थानिक राजकीय विश्लेषक सांगतात.
धाराशिवच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल
या भेटीमुळे धाराशिव जिल्ह्यात नवीन राजकीय समीकरणे आकार घेत असल्याची चर्चा आहे. पालकमंत्री सरनाईक आणि सावंत घराण्याच्या या “गुप्तगु”चा शेवट कुठे होणार, याची उत्सुकता आता सर्वांच्या मनात आहे












Users Today : 25
Users Yesterday : 67
This Month : 1817
Total Users : 27245