वाशी तालुक्यातील तेरखेडा जिल्हा परिषद गटासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या गटासाठी खुला प्रवर्ग सुटल्याने गेल्या चार वर्षांपासून सातत्याने तयारी करणारे पैलवान विकी चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे.
विकी चव्हाण यांनी 2022 पासूनच या गटासाठी नियोजनबद्ध तयारी सुरू केली असून, त्यांच्या उमेदवारीबाबत आता चर्चेला जोर आला आहे. ते आमदार डॉ. तानाजी सावंत यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. डॉ. सावंत यांच्या विजयात विकी चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याने, त्याची परतफेड म्हणून जिल्हा परिषद उमेदवारी त्यांनाच मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
तेरखेडा गटातून जवळपास 1700 मतांचे मताधिक्य विकी चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिले होते. त्यांच्याकडे पैलवानांचे एक मजबूत संघटन आहे, जे सतत डॉ. सावंत यांच्या पाठीशी उभे असते. त्यामुळे विकी चव्हाण यांनी अल्पावधीतच सावंत परिवाराचे विश्वासू सहकारी आणि स्थानिक नेतृत्वाचे केंद्रबिंदू म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी साधी असली तरी उद्योग-व्यवसायाच्या बळावर आणि समाजातील सर्वसामान्य घटकांना एकत्र करून त्यांनी नेतृत्व उभारले आहे. त्यांनी लोकांच्या न्यायहक्कासाठी नेहमीच आघाडी घेतली असून, सर्वसामान्यांचा पाठिंबा त्यांना लाभलेला आहे.
तेरखेडा गट खुला सुटल्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक तरुणांचे स्टेटस पाहता विकी चव्हाण यांच्या उमेदवारीची लाट दिसून येत आहे. त्यामुळे या गटात अनेक दिग्गज नेते असले तरी विकी चव्हाण हेच बाजी मारतील, अशी सर्वसामान्यांमध्ये चर्चा रंगली आहे.













Users Today : 42
Users Yesterday : 81
This Month : 1699
Total Users : 27127