चिंचपूर (ता. भूम):
गेल्या 21 व 22 तारखेला झालेल्या अतिवृष्टीमुळे व नदीला आलेल्या महापुरामुळे चिंचपूर गावातील अनेक शेतकऱ्यांचे जनावरांचे तसेच शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. या संकटसमयी शेतकरी असलेल्या विश्वनाथ दासराव जाधव यांनी आपल्या वडिलांच्या, स्व. दासराव जगन्नाथ जाधव यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवत पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला.

स्व. दासराव जाधव यांनी त्यांच्या काळात “फुल ना फुलाची पाकळी” या भावनेतून सामाजिक कार्य केले होते. त्याच धर्तीवर त्यांचे सुपुत्र विश्वनाथ दासराव जाधव यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना रोख मदत दिली.

एकूण 20 हजार रुपये मदत 5 शेतकऱ्यांना प्रत्येकी 4 हजार रुपये प्रमाणे वितरित करण्यात आली. लाभार्थी शेतकरी पुढीलप्रमाणे –

- विश्वनाथ आप्पा दातखिळे
- अमोल विश्वनाथ ढगे
- सुरेश ठोंबरे
- सुहास गणेश ढगे
- गणेश मोरे
या मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून गावात समाजकार्याची सकारात्मक परंपरा पुढे नेण्याचा संकल्प जाधव यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, “आम्ही दिले, तुम्हीही फुल ना फुलाची पाकळी द्या”.

जाधव यांनी केलेल्या या मदतीची मोठी चर्चा होत आहे कारण ज्यांचे नुकसान झालं आहे त्यांच्या मदतीला शेतकरी धावून आल्यानंतर कोणताही शेतकरी मागे राहणार नाही अशी भावना ही यावेळी विश्वनाथ जाधव यांनी बोलून दाखवली.
याप्रसंगी ह भ प नरेंद्र गिरी महाराज, ह भ प शांतिगिरी महाराज, शिवाजी ढगे, धनंजय जाधव, भगवान पाटील, अमोल ढगे, सतीश आडमुटे, राजाभाऊ जाधव, शिवाजी जाधव,वैभव जाधव, लखन जाधव, प्रथमेश जाधवशिंदे,दादा परंडकर,विठ्ठल ढगे,राजभाऊ विधाते यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते.













Users Today : 25
Users Yesterday : 55
This Month : 1524
Total Users : 26952