देवळाली (ता.भूम):तीन दिवसांपूर्वी रात्री पुराच्या पाण्यात वाहून गेलेला देवळाली येथील युवक गणेश दगडू तांबे यांचा मृतदेह आज अखेर सापडला आहे. परांडा तालुक्यातील सरणवाडी येथील स्मशानभूमीजवळील नदीकाठी हा मृतदेह आढळून आला.
गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक प्रशासनासोबत एनडीआरएफची टीम शोध मोहीम राबवत होती. मात्र मृतदेह देवळालीपासून तब्बल ३० किलोमीटर अंतरावर मिळाल्याने ग्रामस्थांत हळहळ व्यक्त होत आहे.
या दुःखद घटनेबद्दल समाजमन सुन्न झाले असून तात्काळ प्रशासनाने पंचनामा करून मृतकाच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी शासकीय मदत जाहीर करावी, अशी सर्व स्तरांतून मागणी होत आहे.













Users Today : 41
Users Yesterday : 68
This Month : 1766
Total Users : 27194