मराठवाड्यातील शेतकरी व नागरिक पुराच्या मोठ्या संकटात सापडले असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत बांधावर फिरताना दिसले. मात्र, या भेटीत त्यांनी फक्त पोकळ भाषणं करून आणि फोटो काढून शेतकऱ्यांची चेष्टा केली, असा आरोप परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी केला आहे.
पूराच्या पाण्यात गावोगाव मदतीसाठी शिवसैनिक धावत असताना, जीवनावश्यक वस्तू, कपडे, पिण्याचे पाणी आणि किराणा साहित्य स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पोहोचवले जात आहे. मात्र राऊत साहेबांनी एक किलो धान्य वा एक पाण्याची बाटलीही स्वतःच्या खिशातून दिली नाही, फक्त कॅमेऱ्यासमोर पोझ दिल्या, असा टोला डॉ. सावंत यांनी लगावला.
“पूरग्रस्त जनतेला दिलासा देण्याऐवजी रोजचं राजकीय भाषण पाजणं, हेच राऊतांचं काम उरलं आहे. यातून जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम ते करत आहेत. जर मदत करायची क्षमता नसेल तर निदान शांत बसा, एवढी तरी जनतेची अपेक्षा आहे,” असा घणाघात प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी केला.













Users Today : 41
Users Yesterday : 68
This Month : 1766
Total Users : 27194