मुंबई :
शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीचा निरोप देऊन भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांना मुंबईत भेटीसाठी बोलावले.
या निमित्ताने डॉ. सावंत यांनी तातडीने मुंबई गाठून उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. तब्बल दोन तास विविध राजकीय घडामोडी आणि राज्याच्या विकासाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.

विशेष म्हणजे, या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर माजी मंत्री डॉ.तानाजी सावंत हे फारसे पक्षीय बैठक किंवा विधिमंडळ अधिवेशन यामध्ये दिसत नव्हते मात्र आज त्यांनी मुंबई गाठून शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीला राजकीयदृष्ट्या अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
या पार्श्वभूमीवर, “डॉ. सावंत पुन्हा एकदा मंत्रिपदावर पुनरागमन करणार का?” या चर्चांना जोर आला आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तर, “आमदार झाल्यापासून ते मतदारसंघात फारसे आलेले नाहीत; ते मंत्री होऊनच मतदारसंघात येतील” अशी चर्चा सुरू आहे.
भेटीनंतर प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांवरूनही शिंदे आणि सावंत यांच्यातील संवाद सकारात्मक झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा ‘पॅचअप’ आगामी सावंत यांच्या राजकारणात महत्त्वाचा ठरू शकतो असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे.












Users Today : 22
Users Yesterday : 67
This Month : 1814
Total Users : 27242