धाराशिव, ६ जून: धाराशिव जिल्ह्यातील उबाठा पक्षाला मोठा धक्का बसला आहे. युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख निलेश शिंदे यांच्यासह हरिदास शिंदे, बालाजी झेंडे, आदित्य शिंदे, निसार सय्यद, अनिमेश सोनकवडे, स्वप्नील शिंदे, रत्नदीप पडोळे आणि वैभव शिंदे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला.

हा पक्ष प्रवेश मुंबईत, धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी शिवसेना सह-संपर्कप्रमुख भगवान देवकते, आकाश कोकाटे, तसेच युवासेना शहरप्रमुख सागर कदम हेही उपस्थित होते.

या घडामोडींमुळे धाराशिव जिल्ह्यातील उबाठा गटामध्ये अस्वस्थता पसरली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी, “विकासासाठी आणि खऱ्या शिवसेनेसाठी” हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट केले आहे.












Users Today : 32
Users Yesterday : 67
This Month : 1824
Total Users : 27252