पुणे राजकीय कट्टा वृत्तसेवा -२ मे २०२५ – महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने डीएड व बीएड शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. “शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त केली असल्यास अंतिम वर्षाचे विद्यार्थी सुद्धा परीक्षेस पात्र ठरतील,” असा स्पष्ट निर्णय शासनाने घेतला आहे.

या आधी विद्यार्थ्यांना ही परीक्षा देण्यासाठी शिक्षण पूर्ण झाल्यावरच पात्र मानले जात होते. मात्र, विविध व्यावसायिक परीक्षा जसे की केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये अंतिम वर्षाचे विद्यार्थी परीक्षेस बसू शकतात, या धर्तीवर राज्य शासनाने हे सुधारित धोरण लागू केले आहे.


हा निर्णय शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या हिताचा असून, २०२५ मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. या अंतर्गत, अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी देखील परीक्षेस बसू शकतील. परंतु त्यांनी परीक्षेतील गुण उंचावण्यासाठी पुन्हा चाचणी दिल्यास, नवीन निकाल ग्राह्य धरला जाईल.
राज्यभरातील हजारो डीएड व बीएड विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असून त्यांच्या शिक्षक बनण्याच्या स्वप्नाला गती मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ:
www.maharashtra.gov.in












Users Today : 22
Users Yesterday : 67
This Month : 1814
Total Users : 27242