नवी दिल्ली – देशातील परवडणाऱ्या आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेले डॉक्टर राहुल घुले यांनी भारताचे महामहिम उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
या औपचारिक भेटी दरम्यान, डॉ. घुले यांनी देशातील सर्वसामान्य जनतेसाठी स्वस्त, दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध होण्यासाठी एक सविस्तर प्रस्ताव उपराष्ट्रपती महोदयांच्या समोर सादर केला. यामध्ये ग्रामीण आरोग्य व्यवस्था बळकट करणे, वैद्यकीय सुविधा डिजिटल माध्यमातून जोडणे, आणि गरीब घटकांसाठी विनामूल्य आरोग्य योजना वाढवणे यांसारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश होता.
उपराष्ट्रपतींनी या चर्चेची गंभीर दखल घेत डॉ. घुले यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि असे सामाजिक बांधिलकीचे उपक्रम देशासाठी दिशादर्शक ठरतात, असे मत व्यक्त केले.
या भेटीबाबत भावना व्यक्त करताना डॉ. राहुल घुले म्हणाले,
“भारताच्या उपराष्ट्रपतींच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्याचा योग हा माझ्या जीवनातील अत्यंत मोलाचा आणि प्रेरणादायी क्षण आहे. आरोग्य क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी ही भेट निर्णायक ठरेल, असा मला विश्वास आहे.”













Users Today : 49
Users Yesterday : 77
This Month : 1625
Total Users : 27053