कळंब | प्रतिनिधी
कळंब तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरपंच पदासाठी आरक्षणाची यादी अखेर जाहीर झाली असून, अनेक राजकीय दिग्गजांच्या गोटात खळबळ उडाली आहे. आरक्षणामुळे काही ठिकाणी सत्ता टिकवणे अवघड होणार आहे, तर काही नवख्या नेतृत्वाला संधी मिळणार आहे.
या यादीनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गांमध्ये गावे वाटप करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे काही राजकीय नेत्यांची गावे महिलांसाठी किंवा आरक्षित प्रवर्गासाठी निघाल्यामुळे त्यांच्या पुढच्या रणनितीवर त्याचा थेट परिणाम होणार आहे.
अनुसूचित जातीसाठी आरक्षित गावे – पिंप्री (शि), डिकसळ, जायफळ, वडगाव (शि), भाटशिरपुरा, सापनाई, सातेफळ, गौर, वाकडी के.
SC महिला प्रवर्गासाठी – शिंगोली, पाथर्डी, देवळाली, कन्हेरवाडी, जवळा खुर्द, आवाड शिरपूरा, कोथळा, मंगरूळ, बाभळगाव.
अनुसूचित जमातीसाठी – नागूलगाव, तर ST महिला – घारगाव.
सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित गावे – रांजणी, पाडोळी, चोराखळी, उपळाई, हावरगाव, दाभा, खोंदला, गंभिरवाडी, बांगरवाडी, कोठाळवाडी, बोरवंटी, लासरा, वाणेवाडी, उमरा/परतापूर, गोविंदपूर, गौरगाव, खामसवाडी, लोहटा पूर्व, मस्सा ख, तांदुळवाडी, पिंपळगाव को, खेर्डा, अंदोरा, बारातेवाडी.
सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुली गावे – ईटकुर, ढोराळा, एकुरका, ताडगाव, पिंपळगाव डोळा, आढाळा, सात्रा, भोगजी, रायगाव्हन, बहुला, आथर्डी, बरमाचीवाडी, वाकडी ई., बोरगाव ध., हिंगणगाव, करंजकल्ला, लोहटा पश्चिम, मोहा, नागझरवाडी, शिराढोण, वाघोली, सौंदना आंबा.
ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित गावे – वाठवडा, येरमाळा, शेलगाव दि, भोसा, आडसूळवाडी, दुधाळवाडी, हासेगाव शि, देवधानोरा, सौंदना ढोकी/एरंडगाव, हासेगाव केज, खडकी, दहिफळ.
ओबीसी महिला प्रवर्गासाठी – नायगाव, मलकापूर/संचितपूर, हाळदगाव, शेलगाव ज, पानगाव, माळकरंजा, शेळका धानोरा, रत्नापूर, भाटसांगवी, वडगाव ज, बोरगाव बु, निपाणी, बोरगाव खुर्द.
या आरक्षणामुळे काही ठिकाणी सत्ताधारी गट अडचणीत येण्याची शक्यता असून, नव्या चेहऱ्यांना पुढे येण्याची संधी मिळेल. काही ग्रामपंचायतींमध्ये महिला आरक्षणामुळे पारंपरिक पुरुष नेतृत्वाच्या गोटात नाराजी आहे.
राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, “या आरक्षणामुळे तालुक्यातील राजकारणाची नवी समीकरणे तयार होतील आणि अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.”











Users Today : 22
Users Yesterday : 67
This Month : 1814
Total Users : 27242