ग्रामीण भूमीतील स्वप्नाची पुण्यातील चविष्ट पुर्तता – अक्षय खवले यांच्या ‘हॉटेल सह्याद्री’ला डॉ. प्रतापसिंह पाटील यांची सदिच्छा भेट
हातोला (ता. वाशी, जि. धाराशिव) या छोट्याशा गावात जन्मलेला एक तरुण – अक्षय खवले. शिक्षणात हुशार, मनात स्वप्नं मोठी, आणि डोळ्यांत एक प्रामाणिक चमक – “स्वतःचं काहीतरी करायचं…” याच ध्यासाने प्रेरित होऊन पुण्यासारख्या मोठ्या शहरात त्याने हॉटेल व्यवसायात पहिले पाऊल टाकलं.

शून्यावरून सुरुवात करून, आज हिंजवडीसारख्या स्पर्धात्मक भागात “हॉटेल सह्याद्री” या नावाने तो एक ब्रँड बनला आहे. केवळ खाद्यच नव्हे, तर प्रामाणिकपणा, स्वच्छता, आदरातिथ्य व दर्जा यामध्येही ‘सह्याद्री’चा अभिमान जाणवतो.
या यशाचा गौरव करण्यासाठी नुकतीच धनेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी प्राचार्य सतीश मातने, संदीप तिकटे, अशोक सोन्ने यांचीही उपस्थिती होती.

डॉ. पाटील यांनी अक्षयच्या यशाचं कौतुक करताना म्हटलं,
“ग्रामीण पार्श्वभूमी असलेला युवक स्वतःचं अस्तित्व उभं करतो, तेव्हा तो केवळ स्वतःपुरता मोठा होत नाही, तर इतर अनेकांसाठी तो ‘दिशादर्शक दीपस्तंभ’ ठरतो.”
हॉटेल सह्याद्रीमध्ये स्वच्छतेपासून ते पदार्थांपर्यंत प्रत्येक गोष्टीत वैयक्तिक लक्ष, गुणवत्ता आणि आत्मियता जाणवते. हॉटेलमध्ये मसालेदार मटण रस्सा, गावच्या चुलीवरचा स्वाद, ताजं सरबत, आणि घरगुती जिव्हाळा – यामुळे अनेक ग्राहक इथं पुन्हा पुन्हा येतात.

अक्षय खवले सांगतो –
“मी व्यवसाय म्हणून नाही, तर सेवा म्हणून हॉटेल चालवत आहे. ग्राहकांचं समाधान हेच माझं यश!”
या प्रवासामध्ये अक्षयच्या पालकांचं, मित्रांचं, कष्टकरी सहकाऱ्यांचं आणि स्वतःच्या न थांबणाऱ्या मेहनतीचं फार मोठं योगदान आहे. व्यवसायातील अडथळे, आर्थिक अडचणी, स्पर्धा – हे सगळं पार करत, आज तो अनेक तरुणांसाठी एक प्रेरणास्थान ठरतोय.
“जिथे स्वप्नं सह्याद्रीसारखी अढळ असतात, तिथं यशही चवदार आणि कायमस्वरूपी मिळतं!”

अशा जिद्दीच्या आणि चिकाटीच्या या प्रवासाला सलाम.
अक्षय खवले यांना पुढील वाटचालीस ‘राजकीय कट्टा’तर्फे हार्दिक शुभेच्छा!
अक्षय खवले संपर्क क्रमांक -9834103429












Users Today : 10
Users Yesterday : 77
This Month : 1586
Total Users : 27014