परंडा (प्रतिनिधी) – कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परंडा (जि. धाराशिव) येथे संस्था व्यवस्थापन समिती (IMC) सदस्य म्हणून डॉ. संजय जहागीरदार, विशाल काशीद आणि हिमालय विजय वाघमारे यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल भाजपाचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. झहीर चौधरी, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, ओबीसी मोर्चाचे साहेबराव पाडुळे, तालुका उपाध्यक्ष व जिल्हा मजूर सहकारी संघाचे संचालक बाबासाहेब जाधव, वैद्यकीय आघाडीचे डॉ. आनंद मोरे, आप्पा मुसळे, गजानन तिवारी, धनंजय काळे, गौरव पाटील, मनोज पवार, सिद्दीक हन्नुरे, सुरज काळे, आकाश मदने, व्यंकटेश दिक्षित, समाधान कोळेकर तसेच महिला मोर्चा शहराध्यक्षा ज्योती भातलवंडे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












Users Today : 29
Users Yesterday : 67
This Month : 1821
Total Users : 27249