आरोग्य मंत्री ना.डॉ.तानाजी सावंत यांच्या प्रयत्नास यश
धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा
भूम परांडा आणि वाशी येथे औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे यांनी आरोग्यमंत्री ना.डॉ.तानाजी सावंत यांना पत्राद्वारे कळवले आहे. महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ.तानाजी सावंत यांनी ही एमआयडीसी मंजूर होण्यासाठी प्रयत्न केले होते या प्रयत्नाला आज यश आले आहे.
यामध्ये भूमला यापूर्वीच एमआयडीसी होती तिथे अतिरिक्त एमआयडीसी मंजूर करण्यात आली आहे तर वाशी व परंडा येथे मात्र नव्याने एमआयडीसीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या भागात नवीन उद्योजक तयार होणार असून उद्योगाला गती येणार आहे तसेच या भागात मोठमोठे उद्योग देखील येऊ शकतात. त्यामुळे या एमआयडीसी मंजुरीचे सर्वत्र स्वागत होत आहे. वाशी येथे ४५१.४४ हे. भूम येथे अतिरिक्त १३४.१५ हे. तर परंडा येथे १३१.४० हे. एवढे औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याच्या अनुषंगाने तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.