शिवसेना पक्षाच्या असंतुष्ट आमदार व काही मंत्र्यांच्या बळावरच मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी
मुंबई राजकीय कट्टा वृत्तसेवा-राज्यात शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधान परिषदेच्या निवडणुकीला दोन पक्ष सामोरे जात आहेत. यामध्ये पुरेसी मते नसताना देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपले विश्वासू सहकारी व पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरवले आहे. मात्र खरी गेम वेगळीच असल्याचं कळत आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असून शिवसेना पक्षातील काही असंतुष्ट आमदार यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात परतायचे आहे मात्र त्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत काही आमदार बसले आहेत. त्यातच काही आमदार व मंत्र्यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबतीत बोलणी केल्याची देखील माहिती आहे मात्र उद्धव ठाकरे त्यांच्यावरती आता विश्वास ठेवायला तयार नाहीत. अशातच तुम्ही विधान परिषदेला तुमचा उमेदवार द्या आम्ही त्याला निवडून आणतो अशा प्रकारची तर त्यांची बोलणी झाली नाही ना? अशी शंका देखील मिलिंद नार्वेकर यांच्या उमेदवारीमुळे येत आहे.खरं तर बळी द्यायचाच असता तर उद्धव ठाकरे यांनी एखाद्या सामान्य शिवसैनिकाला ही उमेदवारी दिली असती. मात्र ही उमेदवारी ज्या अर्थी मिलिंद नार्वेकर यांना मिळाली आहे. त्याअर्थी त्यांचा विजय निश्चित आहे असे देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुकीनंतर राजकीय भूकंप होऊन शिवसेना शिंदे गटातून शिवसेना ठाकरे गटात काही आमदार परतणार का? याचे उत्तर देखील या निवडणुकीच्या निकालानंतरच मिळणार आहे.













Users Today : 48
Users Yesterday : 77
This Month : 1624
Total Users : 27052