धाराशिव राजकीय कट्टा वृत्तसेवा –
सर्व नामांकित चॅनल्स व वेगवेगळ्या सर्वे करणाऱ्या कंपन्यांनी आपले निवडणूक पूर्व अंदाज घोषित केल्यानंतर राजकीय कट्टा या सोशल मीडिया वृत्तवाहिनी देखील आपला अंदाज व्यक्त केला आहे. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील सर्व नामांकित चॅनलने सर्वे देत असताना भारतीय जनता पार्टी व तत्कालीन एकत्रित शिवसेना यांना जवळपास 240 एवढ्या जागा मिळतील असं वर्तवलं होतं मात्र त्यावेळी देखील राजकीय कट्टा हे राज्यातील एकमेव सोशल मीडिया वृत्तवाहिनी होती की त्यांनी जे निकाल दिले होते तसेच निकाल विधानसभेला लागले होते त्यावेळेसचे निकाल देखील आम्ही सोबत जोडले आहेत.

आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक पूर्व अंदाज व्यक्त करताना राजकीय कट्टा सोशल मीडिया वृत्तवाहिनी यांच्या मते महाविकास आघाडीला राज्यात 32 ते 35 जागा मिळतील तर महायुतीला 12 ते 16 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये महायुतीत भाजपाला ९-१२ शिवसेनेला ३ ते ४ व राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळणार असल्याचे त्यांनी वर्तवले आहे तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 14 ते 15 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे तर काँग्रेस पक्षाला दहा ते बारा व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सहा ते सात जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे तर औरंगाबाद लोकसभेची जागा ही इम्तियाज जलील जिंकतील असा देखील अंदाज वर्तवला आहे.

प्रत्येक पक्ष व लोकसभा निहाय जागा
भाजप
दिंडोरी,रावेर,वर्धा,नागपूर,भंडारा,अकोला, जालना, सांगली,पुणे,उत्तर मुंबई,उत्तर पूर्व मुंबई या ११ जागा ते जिंकू शकतात असा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये पुणे सांगली या जागेवर चुरस निर्माण होऊन या जागेत बदल होऊ शकतो.
शिवसेना –
बूलढाणा,ठाणे व कल्याण या लोकसभेच्या जागा शिवसेना पक्षाला मिळतील .
तसेच दक्षिण मुंबई या मतदारसंघावर देखील तुल्यबळ लढत असून या ठिकाणच्या निकालांमध्ये ऐनवेळी काही बदल होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस
रायगड ही जागा जिंकण्याची शक्यता आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष-
दक्षिण मुंबई,उत्तर पश्चिम मुंबई, पालघर, दक्षिण मध्य मुंबई,ठाणे,मावळ, रत्नागिरी -सिंधुदुर्ग
जळगाव, नाशिक,शिर्डी,यवतमाळ, हातकणंगले,धाराशिव व परभणी या जागेवर त्यांचा विजय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होण्याची शक्यता आहे.
यामध्ये दक्षिण मुंबई मतदार संघ हाचुरशीचा आहे.त्यासोबतच रायगड मतदार संघात देखील निकालात फेरफार होऊ शकतो.
काँग्रेस पक्ष –
धुळे,नंदुरबार,रामटेक,गडचिरोली,चंद्रपूर, अमरावती,नांदेड,लातूर,सोलापूर, कोल्हापूर व उत्तर मध्य मुंबई या जागा जिंकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या ११ जागेवर काँग्रेस पक्ष जिंकण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
माढा,अहमदनगर,बीड,शिरूर,सातारा बारामती व भिवंडी या जागेवर विजयी होण्याची शक्यता वर्तवली आहे.
राज्यात अमरावती,जालना,छत्रपती संभाजीनगर, सांगली,बुलढाणा,अकोला व नाशिक या ठिकाणी खऱ्या अर्थाने तिरंगी लढती होतील असे देखील या निकालाच्या शेवटी सांगितले आहे.












Users Today : 32
Users Yesterday : 67
This Month : 1824
Total Users : 27252